नेरी येथे गोपाळ काल्याच्या कीर्तनाने कार्तिक स्नान सोहळ्याची सांगता...
_श्रीकृष्णाच्या हातचा अतुल्य प्रसाद म्हणजे गोपालकाला : ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज मेहुणकर_
नेरी बु येथे ४६ वार्षा पासुनची परंपरा कायम असून चांद्रवर्षातील आठवा व शरद ऋतुतील दुसरा महिना म्हणजे कार्तिक मास १४ नोव्हेंबर पासून कार्तिक मासरंभ झाला होता या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा पुढे मागे वृत्ती का नक्षत्राचा प्रभाव असल्यामुळे या महिन्याला कार्तिक म्हणतात या मासाला ऊर्ज,बाहूल,कार्तिकी अशी ही नावे आहेत या मासातच थंडीची सुरुवात होऊन वृक्ष वारे वाहू लागतात. कार्तिकातील धर्म कृत्यांमध्ये कार्तिक स्नान व दीपदान यांना विशेष महत्त्व आहे या मासात संपूर्ण महिनाभर पहाटे लवकर उठून केल्या जाणाऱ्या नित्य स्नानाला कार्तिक स्नान म्हणतात अश्विन शुद्ध दशमी एकादशी वा पौर्णिमेस स्नानास प्रारंभ करून कार्तिक पौर्णिमेस याची समाप्ती करतात. याच प्रमाणे नेरी येथे १४ नोव्हेंबर पासून रोज पहाटे नित्यनेमाने सकाळी पाच वाजेपासून काकडा आरती व गावातून दिंडी फिरवण्यात येत होती नेरी बु. समस्त भजनी मंडळ,समस्त हरिपाठ महिला भजनी मंडळ व ग्रामस्थ मंडळी नेरी बु.यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते व सांगता ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज मेहुणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. सर्वप्रथम महाराजांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी,हनुमंतराय, महादेवाच्या पिंडीला पुष्प अर्पण करून नतमस्तक होत,त्यांनी संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या
हरीने माझें हरीलें चित्त । भार वित्त विसरलें ॥१॥
आतां कैसी जाऊं घरा । नव्हे बरा लौकिक ॥ध्रु.॥
पारखियांसी सांगतां गोटी । घरची कुटी खातील ॥२॥
तुका म्हणे निवांत राहीं । पाहिलें पाहीं परतुनी ॥३॥
या अभंगाचे निरूपण केले.
या सोहळा प्रसंगी मृदुंगाचार्य पंढरी महाराज सांगळे,अजय महाराज,अजय चौधरी गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज पाटील,वासुदेव महाराज पवार,बाळू महाराज पवार विणेकरी व समस्त भजनी मंडळ माधव इधाटे,अशोक बावस्कर,सुरेश चौधरी,नत्थु वाघ,सुकलाल कुमावत,सुधाकर धनगर,म्हैसुरकर बाबा,शालिक पाटील,गोविंदा काळे,नाना इधाटे,विठ्ठल पाठक,विकास वाघोडे,दादा न्हावी, रामू पवार,दिनकर बेलदर,बापू खोडपे,माणिक गवळी,बाळू गोतमारे,धनंजय इधाटे,संभाजी पाटील,संभाजी इधाटे,छोटू धनगर,संदीप खोडपे,बबलू धनगर,किशोर खोडपे,भीमराव इधाटे,विजय खोडपे,रमाकांत पाटील,अजय चौधरी,सीताराम खोडपे,अमृत धनगर,विवेक कुमावत,अरुण खोडपे,विलास खोडपे,अर्जुन सांगळे,दत्ता इधते परिसरातील भजनी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा