डॉ उल्हास पाटील रक्तपेढी आणि एचडीएफसी बँक भुसावळ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न
रक्तदान_सर्व_श्रेष्ठ_दान
मानवाने कितीही प्रगती केली तरी कृत्रिम रक्त तयार करण्यात अद्याप यश मिळाले नाही. दररोज पेशन्ट साठी रक्ताची होत असलेली मागणी व त्यामानाने होणार पुरवठा यात तफावत आहे. रक्तादानाने ही तूट भरून येण्यास मदत होते.डॉ_उल्हास_पाटील_रक्तपेढी आणि एचडीएफसी_बँक भुसावळ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन गोदावरी फाऊंडेशन संचालिका डॉ.केतकीताई पाटील तसेच डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी ब्रांच मॅनेजर ,नरेंद्र परदेशी, साहाय्यक व्यवस्थापक विजय सोनवणे, निखिलेश तिवारी, अजित बाविस्कर, नितेश चावडा ,मानसिंग बाबूजी,कोलते सर ,भारंबे सर ,सोनाली शर्मा,नेहा दर्डा,सुवर्णा पाटील ,यांचे सह संपूर्ण स्टाफ उपस्थित होते. यावेळी गोदावरी फाऊंडेशन चे वरिष्ठ लेखापाल श्री योगेश पाटील, डॉ उल्हास पाटील रक्त पेढी प्रमुख डॉ नितीन भारंबे, श्री लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.13 वर्षांपासून रक्तदान शिबिर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केले जात असल्याबद्दल डॉ. केतकीताई पाटील यांनी बँक टीमचे अभिनंदन केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा