अखिल भारतीय मराठा महासंघ रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष पदी विश्वजितराजे मनोहर पाटील यांची नियुक्ती
दि. ३०/१२/२०२३(शनिवार) - मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या मराठा आरक्षण विषयावरुन वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. यामुद्द्यावरुन मराठा समाजाच्या सर्व संघटना समाज एकीकरणासाठी काम करतांना दिसत आहेत. वेगवगळे मराठा नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत.अशातच अमळनेर येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांचा दौरा संपन्न झाला.
या बैठकीत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या रावेर लोकसभा क्षेत्रासाठी जिल्हाध्यक्ष म्हणुन विश्वजितराजे मनोहर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मराठा समाजातील प्रत्येक घटकाला-प्रत्येक माणसाला केंद्र बिंदु माणुन त्याच्यामागे भरभक्कमपणे उभा राहिल आणि मराठा समाजात माझा जन्म झाला त्या माझ्या समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य करीत छत्रपती शिवरायांचा आदर्श आणि मराठा महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष स्व.आ. अण्णासाहेब पाटील यांचे बलिदान डोळ्यासमोर ठेऊन समाजकार्य करत राहिल.वरिष्ठांनी टाकलेली जबाबदारी सार्थ ठरवणार असा विश्वास विश्वजितराजे पाटील यांनी दिला. हि नियुक्ती झाल्याबद्दल ॲड.रवींद्र पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष,संचालक-जिल्हा बँक जळगाव),निवृत्ती पाटील (मा.सभापती पं.स.बोदवड), विकास पाटील(मा.सभापती पं.स. मुक्ताईनगर), ईश्वर रहाणे(संचालक कृ.उ.बा.समिती बोदवड),राम पाटील(संचालक कृ.उ.बा.समिती बोदवड), विलास धायले(मा.संचालक कृ.उ.बा. समिती,मुक्ताईनगर) या सर्व मान्यवरांनी भेटुन सत्कार केला तर मा.मंत्री गुलाबराव देवकर,मा.मंत्री सतिष पाटील,आ.चंद्रकांत पाटील,विनोद पाटील(छ.संभाजीनगर),श्रीराम पाटील,संजय गरुड,डिगंबर पाटील,किशोर पाटील,नानासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी फोनव्दारे शुभेच्छा दिल्या.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा