शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर अभ्यास दौऱ्याचे आयोजन..... - दैनिक शिवस्वराज्य

शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर अभ्यास दौऱ्याचे आयोजन.....


 समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर  :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांचे प्रक्षेत्र भेट राज्याबाहेर हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छूक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी केले आहे.
     या कार्यक्रमांतर्गत राज्यातील फलोत्पादन शेतकऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतुने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी हाताळणी , शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया उद्योग स्थापन करणे. फलोत्पादन विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करणे आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करून देणे व या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वत:ची व त्याचबरोबर समुहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे याबाबीसाठी शेतकऱ्यांचे राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. 
    या दौऱ्यात फळबाग , भाजीपाला व फुले लागवड विदेशी फळपीक लागवड आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेता येईल , शिवाय इतर महत्वाच्या बाबींचाही समावेश आहे.फळबाग लागवड भाजीपाला लागवड, फुले लागवड करणाऱ्या शेडनेट गृह व हरितगृह उभारणी , फळप्रक्रीया इत्यादी बाबत प्रशिक्षण घेण्यास इच्छूकांनी असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे अर्ज , 7/12 व 8 अ उतारा, आधारकार्ड व छायाचित्रासह अर्ज करावा असे अवाहनही श्री . राजकुमार मोरे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांनी केले आहे.



Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads