राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेबाबत टास्क फोर्स बैठक संपन्न
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यात रविवार 3 मार्च रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेबाबत तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या अध्यक्षतेखाली पोलिओ टास्क फोर्स बैठक संपन्न झाली.नुकतेच प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी,उपजिल्हा रुग्णालय जामनेर कर्मचारी,ग्रामीण रुग्णालय पहूर कर्मचारी,अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस यांचे प्लस पोलिओ मोहिमेचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले.
जामनेर तालुक्यात जामनेर शहरात १९ तर ग्रामीण भागात २०७ पोलिओ केंद्र अश्या एकूण २२६ पोलिओ केंद्रावर एकाच दिवशी तालुक्यातील ३७२२९ बालकांना पोलिओ लसीचा डोस पाजण्यात येणार आहे.यासाठी ६२६ सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे.४३ पर्यवेक्षक हे पर्यवेक्षणाचे काम करणार आहेत.प्रवाशी,स्थलांतरित,भटके,जिनींग,शेतमजूर,वीटभट्टी असलेल्या भागासाठी ११ मोबाइल व ९ ट्रान्सझीट टीम ची नेमणुक करण्यात आली आहे.
तरी पालकांनी आपल्या ० ते ५ वर्ष वयाच्या बालकांना पोलिओ लसीचा डोस द्यावा,बाळ नुकतेच जल्मलेले असले तरी किंवा यापूर्वी पोलिओ डोस दिला असला तरी असे आवाहन तहसीलदार नानासाहेब आगळे,गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय जामनेर डॉ.विनय सोनवणे,वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पहूर डॉ.हर्षल चांदा,बालविकास प्रकल्प अधिकारी शीला पाटील,रत्ना चौधरी,संघमित्रा सोनार यांच्याकडून करण्यात आले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा