वडापूर येथील ग्रामदैवत प्रभूलिंग यात्रेनिमित्त आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी प्रभुलिंग देवस्थानास दिली सदिच्छा भेट... - दैनिक शिवस्वराज्य

वडापूर येथील ग्रामदैवत प्रभूलिंग यात्रेनिमित्त आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी प्रभुलिंग देवस्थानास दिली सदिच्छा भेट...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : दि. 11 मार्च रोजी वडापूर ता.द.सोलापूर या गावी वडापूरचे ग्रामदैवत प्रभुलिंग यांची यात्रा संपन्न होत असताना या यात्रेनिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्याच्याकार्याध्यक्ष व सोलापूर शहर मध्य च्या आमदार व सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रति सेवाभाव ठेवून सतत कार्यरत असलेल्या आणि सर्व सामान्य जनतेला सर्व बाबतीत न्याय मिळवून देणाऱ्या अशा आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी प्रभुलिंग देवस्थान मंदिरास सदिच्छा भेट देऊन प्रभूलिंग देवस्थानचे दर्शन घेतले.
   यावेळी यात्रा कमिटी व मंदिर समितीच्या वतीने वडापूरच्या उपसरपंच सविता विजय उर्फ तानाजी वाघचवरे यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
  यावेळी प्रारंभी यात्रा कमिटीचे प्रमुख अरुण पाटील सर यांनी त्यांचे स्वागत केले व तदनंतर आमदार प्रणिती ताई यांनी आपले मनोगत व्यक्त केले यानंतर यात्रा कमिटीचे पंडित पुजारी व गणपत पुजारी यांनी त्यांचे आभार मानले.
   यावेळी या कार्यक्रमास दक्षिण सोलापूर तालुक्याचे युवा कार्यकर्ते सचिन गुंड, यात्रा कमिटीचे सदस्य प्रमोद गुंड, अण्णासाहेब दादासाहेब पाटील, प्रगतशील बागायतदार गौरप्पा पुजारी, मारुती शिंदे , मलकारी पुजारी, स्वप्निल चटके, सौरभ वाघचवरे, प्रगतशील शेतकरी अमोघसिद्ध पुजारी, नामदेव गायकवाड, माजी सरपंच खाजाभाई फुलारी, बापू पाटील व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सोलापूर शहर जिल्हा युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, नगरसेवक विनोद भोसले, रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी सदस्य सिद्धार्थ कांबळे, तिरुपती परकीपंढला व सोलापूर येथून आलेले अनेक महिला युवा कार्यकर्ते व वडापूर व पंचकोतील ग्रामस्थ बहुसंख्येत उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads