जामनेरात राजमाता जिजाऊ चौकात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन ... - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात राजमाता जिजाऊ चौकात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन ...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट करण्याच्या निर्णयाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यावर बुधवारी मनुस्मृतीचे दहन केले.या प्रसंगी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून बाबासाहेबांच अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर माजी नगरसेवक मुकुंदा सुरवाडे माजी सभापती नवलसिंग राजपूत यांनी केली आहे
जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडले. हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. सर्व आंबेडकरी जनतेचा अपमान आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या कृत्याचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयापासून गांधी चौक नगरपरिषद समोरील राजमाता जिजाऊ चौकात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधाच्या घोषणा देत पुतळा जाळून निषेध करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या आव्हाड यांच्या कृत्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाचे वतीने तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर माजी सभापती नवलसिंग पाटील मुकुंदा सरवाडे जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांनी केली
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads