नांद्रा हवेली येथील ग्रामसेवकाचा मनमानी कारभार गावातील ग्रामस्थांच्या तक्रारी - दैनिक शिवस्वराज्य

नांद्रा हवेली येथील ग्रामसेवकाचा मनमानी कारभार गावातील ग्रामस्थांच्या तक्रारी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील नांद्रा हवेली येथील ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून दिनांक 27 मे रोजी पंचायत समिती जामनेर येथे गावातील ग्रामस्थ यांनी विस्तार अधिकारी यांना घेराव घातला होता. आणि ग्रामसेवकाचा मनमानीचा पाढा विस्तार अधिकारी यांच्यासमोर मांडला असून गावातील ग्रामस्थांच्या शेततळे कागदपत्रांवर तीन महिन्यांपासून सह्या करण्यास वारंवार टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांनी आज पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी यांना भेटून ग्रामसेवक विषयी समस्याचा पाढा वाचला.सतत तीन तीन महिन्यांपासून कागदपत्रांवर सह्या करण्यास ग्रामसेवक मनमानी कारभार करत होता परंतु गावातील नागरिक ग्रामसेवकाला कंटाळून तक्रार घेऊन पंचायत समिती येथे आले व सर्व हकीगत विस्तार अधिकारी यांना सांगितले त्वरित विस्तार अधिकारी यांनी ग्रामसेवक यांना बोलाऊन घेतले व सह्या का करत नाही तर ग्रामसेवकांनी उडवा उडविचे उत्तरे देत होते.ताबडतोब ग्रामविकास अधिकारी यांना सह्या करण्यास विस्तार अधिकारी यांनी सांगितले.या ग्रामसेवकाची संबंधित अधिकारी यांनी लवकरात लवकर नांद्रा हवेली येथून उचल बांगडी करावी अशी गावातील ग्रामस्थांची मागणी आहे.तसेच गावात घाणीचे साम्राज्य रस्त्यावर सांडपाणी वाहू लागले आहेत.परंतु सरपंच ग्रामसेवक या कडे लक्ष देण्यास कानाडोळा करत आहे. लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लागावे अन्यथा गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिलेला आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads