महाराष्ट्र
खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या विजयात महादेव कोगनुरे चा मोठा वाटा... महादेव कोगनुरे यांच्या निर्णयाचे होतेय सर्वत्र कौतुक....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचाराला जेव्हा सुरुवात झाली.तेव्हापासून महायुतीकडून आमदार रामभाऊ सातपुते आणि महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांचे समर्थन मिळवण्यासाठी बराच प्रयत्न केला गेला होता.शेवटी महादेव कोगनुरे यांनी महाविकास आघाडी बरोबर जाऊन लोकसभेचे उमेदवार खासदार प्रणितीताई शिंदे यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता.फक्त निर्णय घेऊन महादेव कोगनुरे हे शांत बसले नाहीत तर दिवसरात्र एक करुन एम के फाउंडेशन च्या कार्यकर्त्यासमवेत प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत दक्षिण सोलापूर मतदार संघ पिंजून काढला होता.आज जेव्हा सोलापूर लोकसभेचा निकाल जाहीर होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितीताई शिंदे हे भरघोस मतांनी विजयी होताच महादेव कोगनुरे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साहा संचारला आहे.कारण महादेव कोगनुरे यांना जेव्हा दोन्ही गठबंधनाकडून दबाव येत असताना ही महाविकास आघाडी बरोबर जाण्याचा निर्णय महादेव कोगनुरे यांनी घेतला होता.
आज जिल्ह्यात महादेव कोगनुरे यांनी घेतलेल्या याच निर्णयाचे सर्वत्र जोरदार स्वागत होताना पाहायला मिळत आहे.कारण महादेव कोगनुरे यापूर्वी ही माजी खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांच्यासमवेत राहून भाजप पक्ष वाढवण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते.यंदा लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनुरे यांनी केलेला पहिला प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाल्याचे बोलले जात.महादेव कोगनुरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत महादेव कोगनुरे यांचे नक्कीच वजन वाढल्याचे बोलले जात आहे.परंतु भविष्यात महादेव कोगनुरे यांना महाविकास आघाडीकडून भविष्यातील मोठी जबाबदारी मिळणार हे देखील नक्की..
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा