पर्यावरणाचा ढासळता क्रम पाहता वृक्ष लागवड करणे काळाची गरज.. तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांचे जनतेस आवाहन
,दि.05/पर्यावरणाचा ढासळता समतोल यामुळे दिवसागणिक तापमानात होणारी वाढ,आणि याचा निसर्गाच्या ऋतू चक्रावर परिणाम होत असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावणे आवश्यक असल्याचे मत उपविभागीय कृषी अधिकारी~रमेश जाधव यांनी व्यक्त केले आहे.
असेल वृक्ष तर जगेल विश्व,झाडे लावा~ झाडे जगवा,वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.या उक्तीप्रमाणे सर्वच जण रोपे,पौधा, पेड,झाड लावण्या बाबत जनजागृती करीत आहेत.बहुतांश नागरीकांना वृक्षलागवड संदर्भात ईच्छा असते परंतू वरील प्रमाणे रोपे,पौधा,झाड व पेड म्हटले कि त्यांच्या मनात अनेक शंका~ कु शंका व अडचणी निर्माण होतात व नंतर लागवडीपासून परावृत्त होतात,हे होवू नये,प्रत्येक नागरिकां कडून वृक्षलागवडीत सहभाग व्हावा व सहाय्य मिळावे म्हणून आपल्यासाठी एक सोपी व साधी सरळ पद्धत म्हणजेच पावसाळा या हंगामातील जी~जी फळझाडे व वन झाडे यांची फळे पिकलेली असतात, त्याच झाडांची फळे प्रत्येक कुटुंबासाठी किमान एक किलो फळे घ्यावीत व त्यांचा यथेच्छ आस्वाद घेवून त्या "बि"आपल्या स्वतःच्या हाताने लागवड केल्यास आपणास लागवडीसाठी कोणतीही अडचण वा पैसे वा श्रम खर्च करावे लागणार नाहीत.व यातूनच आपोआप करोडो वृक्षलागवड होईल.बिया द्वारे लागवडीची सोपी पद्धत थोडक्यात जी फळझाडे व वनझाडे हे वृक्ष प्रकारातील आहेत,त्यांच्या लागवडीसाठी दोन ते तीन फुटाचा खड्डा खोदून तो पुन:श्च बुजविण्यात यावा.आता बुजविण्यात आलेल्या खड्ड्यात जी "बि"(Seed) लागवड करणार4 आहोत त्या"बि" च्या आकारा एवढीच मातीने "बिया"(Seeds) बुजविण्यात याव्यात व त्यांना एक लिटर पाणी दररोज देण्याची व्यवस्था करावी. पाऊस असेल तर पाणी देण्याची सुद्धा गरज नाही.यालाच म्हणतात" institu Plantation Method"हिच पद्धत सर्वात जुनी व शाश्वत आहेत.यासाठी आपल्याला आंबा,जांभूळ,चिंच,यासह कडुलिंब सह ईतर आपल्या आवडी नुसार वृक्षलागवड करू शकतात.अतिशय कमी किंवा नगण्य खर्चात व नगण्य श्रमात आपण हे काम सहजच करू शकतो व त्यातून मिळतो फक्त आनंद.हा आनंद मी घेतला आहे.माझ्या शेताच्या सर्वच बांधावर जांभूळ,चिंच,मोहोगनी,चिंच कडुलिंब,सिताफळ ईत्यादी सह घन वृक्ष लागवड करून निसर्गरम्य वातावरण तयार केलेले आहेत.शिवाय प्रत्येक वर्षांत जन जागृतीपर चर्चेत भाग घेत स्वतःच दरवर्षी प्रमाणेच याही वर्षांत रस्त्यांच्या कडेला, जंगलात पडिक जमीनीवर ही लागवड सुरूच ठेवणार मित्रांनो,एकच विचारणार प्रथम आचरणात! नंतरच सांगणार!! 'वृक्ष लावा देश वाचवा,वृक्षलागवड लावा जग वाचवा!, वृक्ष लागवड,लावा पृथ्वी वाचवा !मित्रांनो हा संदेश प्रोत्साहना साठी व वृक्ष लागवडीच्या साध्या -- सोप्या पद्धती साठी व वृक्ष संवर्धनासाठी तसेच तांत्रिक माहितीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यां पर्यंत,जनतेपर्यंत व नागरिकांपर्यंत पोहोचवा.तांत्रिक मार्गदर्शन हवे असल्यास व मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसाठी संपर्क::-रमेश जाधव, उपविभागीय कृषि अधिकारी,पाचोरा, मोबाईल क्र-7588814849(टिप :- ज्यांना मोठ्या प्रमाणात लागवड करावयाची आहे त्यांनी प्रथम व्हॅटस्ॲपवर आपली ओळख व उद्देश पाठवावेत,मी नंतर स्वतःहून आपल्याशी संपर्क साधेल.)
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा