जामनेरच्या प्रथम दहीहंडी महोत्सवात मुंबईतील महिला गोविंदांचा थरार – 30 ऑगस्टला राजमाता जिजाऊ चौकात उत्सव - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरच्या प्रथम दहीहंडी महोत्सवात मुंबईतील महिला गोविंदांचा थरार – 30 ऑगस्टला राजमाता जिजाऊ चौकात उत्सव

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर शहरात यंदा प्रथमच दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, हा उत्सव 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता राजमाता जिजाऊ चौक येथे पार पडणार आहे. या महोत्सवाचे आयोजन प्रतिष्ठित गिरीशभाऊ महाजन फाउंडेशनने केले आहे, आणि या उत्सवात मुंबईच्या प्रसिद्ध महिला गोविंदा पथकांचा थरार पाहायला मिळणार आहे.या दहीहंडी महोत्सवाचे मुख्य आकर्षण मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे असणार आहे.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून  जयवंत भालेकर, तसेच मुंबईतील प्रसिद्ध नृत्यांगना रिचा अग्निहोत्री ह्यांची उपस्थिती असणार आहे. यासह श्यामसुंदर राजपूत, प्रभाकर मोरे, विलास शिरसाट आणि इतरही मान्यवरांच्या उपस्थितीत हा दहीहंडी महोत्सव रंगणार आहे.गिरीशभाऊ महाजन फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली, जामनेरमध्ये प्रथमच असा भव्य दहीहंडी महोत्सव आयोजित केला जात आहे, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे.
ठिकाण: राजमाता जिजाऊ चौक, जामनेर वेळ: 30 ऑगस्ट 2024, सायं. 4:00 वाजता
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads