महायुती सरकारच्या विरोधात काळे फुगे आंदोलन: शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे गटाचे तीव्र आंदोलन... - दैनिक शिवस्वराज्य

महायुती सरकारच्या विरोधात काळे फुगे आंदोलन: शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे गटाचे तीव्र आंदोलन...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन पाटील 
दि. २७/०८/२०२४ (मंगळवार) रोजी जामनेर तालुक्यातील नेरी येथे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने गटाने महायुती सरकारच्या विरोधात एक अनोखे आणि तीव्र आंदोलन केले. महिलांवरील अत्याचाराच्या घटना, सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार, वाढती गुन्हेगारी, आणि शेतकऱ्यांवरील अन्याय याकडे लक्ष वेधण्यासाठी पक्षाने महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्याचे पत्रक वाटून, "काळे कारनामे" लिखित काळे फुगे आकाशात सोडून सरकारचा निषेध व्यक्त केला.या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पक्षाचे जामनेर तालुकाध्यक्ष किशोर पाटील, युवक उपजिल्हाध्यक्ष किशोर खोडपे, विश्वजित मनोहर पाटील, राजू पाटील, आशिष दामोदर, भगवान पाटील, सौरभ अवचार, सागर कुमावत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या कारभारातील त्रुटी आणि त्यांचे दुष्परिणाम उघड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागरिकांमध्ये या आंदोलनाची विशेष चर्चा होत आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads