धनगर समजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न.... - दैनिक शिवस्वराज्य

धनगर समजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न....


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : धनगर समजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व पत्रकारांचा गौरव सोहळा सोलापूर येथील शिवस्मारक सभागृह येथे पार पडला आहे. यावेळी धनगर समाज सेवा संस्था व संघर्ष सेना. यांच्या वतीने समाजातील विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आले आहे.             यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी धनगर प्रबोधन मंचचे अध्यक्ष विलास पाटील व प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.अरविंद कुमठाळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, सिद्धारूढ बेडगनूर,शिवसेना शिंदे गटाचे अण्णप्पा सतुबर,क्रांतिवीर किसान सेनेचे संस्थापक अध्यक्ष करणराजे गडदे,एम .वाघमोडे,प्रभाकर घायाळ,निर्मला पाटील,प्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ दौला ठेंगील,जेष्ठ पत्रकार उज्वलकुमार माने,बाळासाहेब वाघमोडे, विंचूरचे उपसरपंच भीमाशंकर फुलारी, बचत गटाचे अध्यक्ष अंबिकाताई गुरव,उपस्थित होते. 
       यावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र,सन्मान चिन्ह,शेला देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रा.देवेंद्र मदने,सोपान खांडेकर,घनशाम यलगुंडे,कुमार कांबळे,राम वाघमोडे,आदी उपस्थित होते.
       सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघर्ष सेनेचे प्रदेश युवक अध्यक्ष विशाल पाटील,जिल्हाध्यक्ष संदीप कांबळे,शहर अध्यक्ष निखिल घोडके,ओबीसी अध्यक्ष गौरव पवार, भीमराव माने,राहुल सावंत यांचा विशेष सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव व्हनमाने व ललिता लवटे यांनी केले तर आभार संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष शेखर बंगाळे यांनी मानले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads