जामनेरात सत्यशोधक पद्धतीने स्वर्गीय दिलीप विजय माळी यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम संपन्न.. - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात सत्यशोधक पद्धतीने स्वर्गीय दिलीप विजय माळी यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम संपन्न..

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
स्वर्गीय दिलीप विजय माळी (जन्म दिनांक: 19 सप्टेंबर 1989; मृत्यू दिनांक: 16 ऑगस्ट 2024) यांच्या दशक्रिया विधी व सुगंध मुक्तीचा कार्यक्रम आज, 28 ऑगस्ट 2024 रोजी माळी गल्ली, राहत्या घरी महात्मा फुले यांच्या स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म म्हणजेच सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला. विधी सांडूबा पांडव छत्रपती संभाजी नगर यांच्या हस्ते करण्यात आला. स्वर्गीय दिलीप विजय माळी हे एक समर्पित समाजसेवक होते. ते नेहमीच सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत, व स्वखर्चाने जेवणाची सोय करत असत. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. सदर कार्यक्रमास असंख्य नातेवाईक आणि समाज बांधव उपस्थित होते. ह. भ.प देवराम शिवराम माळी, समाजसेवक मुकुंदा माळी, कैलास माळी, विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पवनभाऊ माळी, युवराज माळी, नंदू माळी, दीपक माळी, किरण झाल्टे, आकाश माळी, शेनफडू वराडे, शिवाजी पाटील, अनिल माळी, सत्यशोधक समाजाचे प्रचारक रमेश दादा वराडे हे कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची प्रेरणा सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव डॉ. सुरेश झाल्टे, विजय सर, आणि प्रचारक रमेश दादा वराडे यांच्या मार्गदर्शनाने मिळाली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads