जामनेर तालुक्यातील माऊली इंटरनॅशनल स्कूल वाघारी येथे दहीहंडी उत्साहात साजरी...
वाघारी, २८ ऑगस्ट २०२४: माऊली इंटरनॅशनल स्कूल, वाघारी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण राधा यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी दहीहंडी थर लावून वातावरणात रंग भरले. "हाती घोडा पालखी... जय कन्हैया लाल की..." असा जयघोष करत विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.
विशेष म्हणजे, या वर्षी दहीहंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूक करण्यासाठी अनोखी संकल्पना राबविण्यात आली होती. माऊली इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने दहीहंडीमध्ये पर्यावरण संरक्षणासंबंधी संदेश देणारी कार्ड्स ठेवण्यात आली होती. दहीहंडी फोडल्यावर विद्यार्थ्यांनी ही कार्ड्स गोळा करून त्यावर लिहिलेला मजकूर वाचून घेतला. त्यानंतर शिक्षकांनी त्या मजकुरावर आधारित पर्यावरणाच्या संरक्षणाविषयीची माहिती विद्यार्थ्यांना पटवून दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व गुणांना देखील वाव मिळाला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माऊली इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष सुनील कडू तारूळकर, प्रिन्सिपल मनोज सरताळे, तसेच शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा