अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात सरपंचांचे उपोषण, मंत्री गिरीश महाजन यांनी दिला तोडगा काढण्याचा शब्द
मुंबई: अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अनेक सरपंच, उपसरपंच, आणि ग्रामपंचायत कर्मचारी विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या व मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जात आहे.आज, महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले आणि लवकरच तोडगा काढला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. महाजन यांच्या या आश्वासनामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.सरकारच्या वतीने तातडीने उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईल, अशी माहितीही महाजन यांनी दिली. या चर्चेतून समाधानकारक तोडगा निघावा, अशी अपेक्षा सर्वांमध्ये आहे.दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी सरकारने यावेळी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी केली नाही तर संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा