महाराष्ट्र
साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रीडा पारितोषिक वितरण संपन्न ...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा पारितोषिक वितरण कार्यक्रम दि. 8 ऑगस्ट रोजी कुरुल व अंकोली केंद्राचे केंद्रप्रमुख राजकुमार राऊत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला .
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भीमराव परीक्षाळे हे उपस्थित होते . सदर कार्यक्रमास जि.प .प्राथमिक शाळा परमेश्वर पिंपरी तालुका मोहोळ चे मुख्याध्यापक वडने सर व जि.प. प्राथमिक शाळा दादपूर प्रशालेचे पदवीधर शिक्षक इंद्रजीत जगताप यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला .
प्रथमता देशभक्त कृ.भी. अंत्रोळीकर, कै . नानासाहेब अंत्रोळीकर, कै.वसंतराव आपटे यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर राजकुमार राऊत, वडने , इंद्रजीत जगताप , यांचा सत्कार संस्थेचे सचिव भीमराव परीक्षाळे व प्रशालेचे मुख्याध्यापक नुरुद्दिन शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले . तसेच भिमराव परीक्षाळे यांनी जि. प. प्राथमिक शाळेमध्ये 9 ऑगस्ट या दिवशी 32 वर्ष सेवा पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केंद्रप्रमुख राजकुमार राऊत यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी राजकुमार राऊत म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करावे शारीरिक व्यायाम करणे हे अत्यंत महत्त्वाचे असून आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे असे विचार व्यक्त केले तसेच क्रीडा सप्ताहाचे महत्व आपल्या विचारातून सांगत विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्याचा प्रयत्न करत विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले . त्याचबरोबर वडने सर यांनी मार्गदर्शन करत असताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी मोबाईल दूर ठेवून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व क्रीडा व व्यायामाला महत्त्व द्यावे असे विचार व्यक्त केले त्याचबरोबर पदवीधर शिक्षक इंद्रजीत जगताप यांनीही विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून शिक्षण क्षेत्रात उंच भरारी घ्यावी असे अनमोल विचार मांडले . भीमराव परीक्षाळे यांनीही विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करून स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा व कै. नानासाहेब अंत्रोळीकर अभ्यासिकेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी आतापासूनच पुस्तके वाचण्याची सवय ठेवावी जेणेकरून भविष्यात स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्याला अडचणी निर्माण होणार नाहीत याची सवय विद्यार्थ्यांनी आत्तापासून लावावी असे मार्गदर्शन केले . कार्यक्रमानंतर कै.नानासाहेब अंत्रोळीकर अभ्यासिकेला भेट देण्यासाठी केंद्रप्रमुख राजकुमार राऊत, वडने सर , दादपूर प्रशालेचे पदवीधर शिक्षक इंद्रजित जगताप या मान्यवरांनी नानासाहेब अंत्रोळीकर अभ्यासिकेला भेट देऊन तेथील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अभ्यासिका पाहून अशा अभ्यासिका प्रत्येक गावागावात व्हायला पाहिजे असे मत व्यक्त करून अभ्यसिकेला आपला वाडा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आनंदकुमार अंत्रोळीकंराचे आभार मानले . व ही अभ्यासिका अंत्रोळीमध्ये स्थापन केल्याबद्दल भीमराव परीक्षाळेचे अभिनंदन केले .सदर कार्यक्रमास समाजसेवक राम कोळी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक नुरुद्दीन शेख सर , गजानन कोले सर, दत्तात्रय शिंदे , रवींद्र गावित सर , सोमनाथ साळुंखे सर, म्हाळप्पा वडरे सर, बसवराज चौगुले , गोपाळ पाटील , शर्मा सुतार यांनी परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय शिंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सोमनाथ साळुंखे सर यांनी मानले .
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा