पुन्हा पत्रकारांच्या सर्तकतेने लाखो रुपयांचा अवैध गुटखा पोलिसांना केला स्वाधीन.... - दैनिक शिवस्वराज्य

पुन्हा पत्रकारांच्या सर्तकतेने लाखो रुपयांचा अवैध गुटखा पोलिसांना केला स्वाधीन....

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा मध्यप्रदेशातील बुरहाणपुर वरुन मुक्ताईनगर मार्गे जळगाव येथे जात असलेला लाखो रुपयांचा गुटखा पत्रकार नितिन सुरवाडे जि एस नाइन न्युज जळगाव जिल्हा प्रतिनिधी,अर्जुन आसणे नवराष्ट्र तालुका प्रतिनिधी मुक्ताईनगर बोदवड प्रतिनिधी,जयराज पवार महा इंडिया न्युज संपादक,चेतन तायडे महा इंडिया न्यूज उपसंपादक यांनी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिली 
सविस्तर वृत असे की दि.9 रोजी सकाळी 12वाजेच्या सुमारास सदर पत्रकार हे मुक्ताईनगर मार्गे रावेर खासगी कामासाठी जात असतांना बोलोरो पिक क्रमांक.MH.15.HH.1088 गाडी क्रमांकाची गाडी भरधाव वेगाने मुक्ताईनगर कडे पुरनाड फाट्यावरून जात असतांना गाडी चालकाच्या हालचाली वरून सदर गाडीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा असल्याची शंका आल्याने पुरनाड फाट्याजवळ गाडी थांबवली असता सदर गाडी चालक याची विचारपूस केली असता एवढ्या भरधाव वेगाने गाडी का चालवत आहे असे विचारले असता गाडी मध्ये अवैध गुटखा असल्याची कबुली गाडी चालकाने दिली तसेच तात्काळ दुरध्वनीद्वारे मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.राजकुमार शिंदे साहेब यांना संपर्क करून संबंधित गाडीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा असल्याची कबुली गाडी चालकाने दिली आहे तरी आपण आपल्या पोलिस कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवावे व गाडी ताब्यात घ्यावी असे सांगण्यात आले त्या अनुषंगाने काही मिनिटांतच दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व सदर गाडी पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात आली व चालक चेतन बारी रा.जळगांव यांना पत्रकारांनसमोर विचारपूस केली असता मुळ जळगाव चे असल्याचे सांगितले सदर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस स्टेशन मध्ये चालु आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads