महादेव कोगनुरे यांच्या जनता दरबारला उत्स्फूर्त प्रतिसाद ; महादेव च्या जनता दरबारात सामान्य जनतेला मिळतोय न्याय... - दैनिक शिवस्वराज्य

महादेव कोगनुरे यांच्या जनता दरबारला उत्स्फूर्त प्रतिसाद ; महादेव च्या जनता दरबारात सामान्य जनतेला मिळतोय न्याय...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेस चे जनसेवक महादेव कोगनुरे यांनी सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काॅग्रेस पक्षांकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.यासाठीच जनसेवक महादेव कोगनुरे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून सर्व सामान्य माणसांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूर येथे दररोज जनता दरबार भरविण्यात येत आहे.या जनता दरबार मध्ये महादेव कोगनुरे यांनी आपले सर्व काम बाजूला ठेवून सामान्य माणसांचे प्रश्न जागेवरच कसा मार्गी लावता येईल यासाठी अथक परिश्रम घेताना दिसतात. जनता दरबार च्या माध्यमातून सर्व सामान्य माणसांच्या विविध समस्या जागेवरच सोडविण्यात येत असल्याने दिवसेंदिवस महादेव कोगनुरे यांच्या जनता दरबारला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसून येत आहे.
   दररोज दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य नागरिक जनता दरबारला उपस्थितीती लावून आपले विविध प्रश्न आणि समस्या महादेव कोगनुरे यांच्या समोर मांडतात दिसतात.यात सामान्य शेतकरी, महिला, मजूर,शहरातील नागरिक तसेच युवकांचा मोठा प्रतिसाद या जनता दरबारला मिळत आहे.सध्या सोलापूर जिल्ह्य़ातच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्ते सध्या अ‍ॅक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. 
     महादेव कोगनुरे यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते सध्या निवडणूक हातात घेण्यासाठी सज्ज झाल्याचे बोलले जात आहे.जनता दरबार, कृषि मेळावा,मोफत आरोग्य शिबीर, जळीतग्रस्तांना मदतीचा हात तसेच शैक्षणिक,सामाजिक आदी समाजोपयोगी कार्यातून पाहिल्यास दक्षिण मध्ये महादेव कोगनुरे यांचे राजकीय वर्चस्व वाढल्याचे बोलले जात आहे.महादेव कोगनुरे यांनी जनतेचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.यामुळेच महादेव कोगनुरे यांच्या जनता दरबारला नागरिकांचा गर्दी होताना दिसून येत आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads