महाराष्ट्र
मोहोळ तालुक्यातील वटवटे व परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरू, पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष....
समीर शेख प्रतिनिधी
कामती : वटवटे येथील दारूबंदी चा ठराव केलेला असताना ग्रामपंचायतीने कामती पोलीस स्टेशन यांना पत्र दिलेले असताना व तसेच गावातील नागरिक मल्हारी दत्तात्रेय जगधने यांनी वैयक्तिक पत्र दिलेले असताना कुठल्याही प्रकारचे दखल घेतलेली नाही व तसेच सोलापूर ग्रामीण आयुक्त यांनाही त्यांनी पत्र दिलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे देखील त्यांनी पत्र दिलेला आहे पूर्ण प्रशासन या गावाबद्दल बेदखल आहे हे यावरून समजते की गावातील युवक हा दारूच्या आहारी जात आहे आणि गोरगरिबाचे कुटुंबे उध्वस्त होताना दिसत आहेत तरीसुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे ही खेदाची बाब आहे.
मोहोळ तालुक्यातील सर्वात मोठा गाव असलेला वटवटे मध्ये व इतर काही ठिकाणी सर्वत्र खुलेआमपणे अवैद्य धंदे सुरू असून पोलिस प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे वटवटे गावात दारू ,अवैध धंदे व हातभट्टी दारू खुलेआमपणे चालू असूनही पोलीस हे अवैद्य प्रकरारावर कारवाई करताना दिसून येत नाही तर आजूबाजूच्या गावांमध्ये चुकिचा संदेश जात असल्याने समोर येत आहे मग या अवैध धंदा व्यवसायिका वर कारवाई करणार तरी कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. गावात खुलेआम हातभट्टी दारू, गुटका आणि त्यात मावा यावर अंकुश ठेवण्यात पोलीस स्टेशनला अक्षरशः अपयश आले असून सर्व सुरू असताना कारवाईचा बडगा उचलला जात नाही. कारण दारु विक्री वाले सरळ सरळ बोलतात काही कोणी आमचं काही करू शकत नाही त्यामुळे अवैध धंद्या वाल्यांवर कसलाही धाक नसल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळेच वटवटे परिसरात गावात रात्रण-दिवसभर सर्व प्रकारच्या अवैध धंदे खुलेआमपणे सुरू असल्याचे दिसत आहे.ताडी,हातभट्टी,दारू याचा नुसता नंगा नाच सुरू असून यातून कधी कुणाचा बळी जाईल हे सांगता येणार नाही.हे ही तितकेच खरे थोडक्यात काय तर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बघा काय चाललय ? वटवटे व इतर खेडेगावातील जे सामान्य नागरिकांना जे दिसते ते पोलिसांना का दिसु नये?अशा गोष्टी (जाणून बुजून चालु आहेत) सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी स्वतः लक्ष देऊन वेळीच आवर घालने गरजेचे आहे.अशा अवैध धंद्यांना वेळीच लगाम घालून कठोर कारवाई करणार का? हे पाहणे उचित ठरेल. नाहीतर विनाकारण आणखी काही माता-बहिणीच्या कपाळावरचे कुंकू पुसण्याची वेळ येईल हे तितकच कटू सत्य आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा