मनोज पवार यांनी स्वीकारला मंद्रूप पोलीस ठाण्याचा पदभार ; सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांची साताऱ्याला बदली - दैनिक शिवस्वराज्य

मनोज पवार यांनी स्वीकारला मंद्रूप पोलीस ठाण्याचा पदभार ; सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांची साताऱ्याला बदली


समीर शेख प्रतिनाधी
 सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्याकडून पदभार स्वीकारला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांची सातारा येथे बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी पवार हे रुजू झाले आहेत. नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे पुणे, अकलूज याठिकाणी आतापर्यंत सेवा बजावली आहेत. २०१० साली पोलीस प्रशासनामध्ये दाखल झाले आहेत. नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे एक कर्तव्यदक्ष कार्यतत्पर अधिकारी म्हणून परिचित आहेत. यावेळी मंद्रूप पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
मंद्रूप पोलीस ठाण्याचा नाव लौकीक करण्यासाठी प्रयत्नशील...
मंद्रूप पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. कर्नाटक- महाराष्ट्र सीमावरती भागातील महत्त्वाचे पोलीस ठाणे असल्यामुळे या भागातील सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून मंद्रूप पोलीस ठाण्याचा नावलौकीक करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत :- मनोज पवार, नूतन सहायक पोलीस निरीक्षक, मंद्रूप पोलीस ठाणे
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads