लखपती दीदी" मेळाव्याच्या तयारीसाठी मंत्री गिरीश महाजनांनी जळगावातील स्थळाची केली पाहणी... - दैनिक शिवस्वराज्य

लखपती दीदी" मेळाव्याच्या तयारीसाठी मंत्री गिरीश महाजनांनी जळगावातील स्थळाची केली पाहणी...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
दिनांक २५ ऑगस्ट रोजी जळगावमध्ये होणाऱ्या "लखपती दीदी" मेळाव्याच्या तयारीसाठी मंत्री गिरीश महाजन यांनी आज विशेष पाहणी केली. यावेळी त्यांनी मेळाव्याच्या नियोजित स्थळाचा आढावा घेतला आणि प्रशासनास यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सूचना दिल्या. चाळीसगावचे आमदार मंगेशदादा आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. मंत्री महाजन यांनी प्रशासनास सजग राहण्याचे आणि मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आवश्यक उपाययोजना सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्याच्या आयोजनासाठी तयारीच्या प्रत्येक तपशिलाची काळजी घेतली जात आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads