बदलापूर येथील मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जामनेर व पहूर येथे काळ्या फिती लावून मूक मोर्चा.. - दैनिक शिवस्वराज्य

बदलापूर येथील मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जामनेर व पहूर येथे काळ्या फिती लावून मूक मोर्चा..

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 बदलापूर येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जामनेर तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने आज  काळ्या फिती लावून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाचा समारोप तहसील कार्यालयात झाला, जिथे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.या आंदोलनात जळगाव जिल्हा महिला आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत, तालुकाप्रमुख एडवोकेट ज्ञानेश्वर बोरसे, दिलीप पाटील, प्रल्हाद बोरसे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर राजपूत, जिल्हा सचिव मूलचंद नाईक, उपजिल्हा संघटक गणेश पांढरे, तालुका संघटक संजय पाटील, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या डॉ. ऐश्वर्या राठोड आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील व डॉ. मनोहर पाटील तसेच महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहूर येथे मूक मोर्चा बस स्टँड येथील छत्रपती शिवाजी चौकातून सुरू झाला. मोर्चाचा समारोप पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप सानप यांना निवेदन देऊन करण्यात आला.या मूक मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल लोढा, जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बोरसे, उपजिल्हा संघटक गणेश पांढरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दिगंबर दादा पाटील, विलास पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर राजपूत, मूलचंद नाईक, अशोक चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे, डॉक्टर प्रशांत पाटील, शहर प्रमुख संजय तायडे, किरण पाटील, सुनील पाटील, विनोद पाटील, विनोद ठाकूर, अशोक जाधव, भाऊराव गोंधनखेडे, रायदास गोंधन खेडे, ग्रामपंचायत सदस्य महेश पांढरे, सचिन देशमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख राष्ट्रवादी रमेश पांढरे, अशोक वारुळे, तसेच किशोर पाटील आणि डॉ. मनोहर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads