अज्ञात वाहनाच्या धडकेत नेरी येथील तरुणाचा जागीच मृत्यू.... - दैनिक शिवस्वराज्य

अज्ञात वाहनाच्या धडकेत नेरी येथील तरुणाचा जागीच मृत्यू....

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
काल रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान हर्षल गोपाल वराडे वय अंदाजे ३२ हा घरी जात असताना  अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली असता या तरुणाला जागेच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच नेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह  शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून हर्षल च्या अपघाताची वार्ता नेरी दिगर परिसरात कळताच नेरी दिगर  परिसरात शोककळा पसरली हर्षल च्या पश्चात आई-वडील भाऊ असा परिवार आहे पुढील तपास नेरी पोलीस स्टेशन करीत आहे रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads