जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार ॲक्शन मोडवर, अवैध धंद्यांवर मोठी कारवाई; १ लाख रुपयांची गावठी दारू आणि रसायन नष्ट
जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार हे आता ॲक्शन मोडवर आले असून, अवैध दारू धंद्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. जामनेर तालुक्यातील भागदरा गावात मोठ्या प्रमाणात चालवण्यात येणाऱ्या अवैध गावठी दारू व्यवसायावर कारवाई करत पोलिसांनी सुमारे १ लाख रुपयांची गावठी दारू आणि रसायन नष्ट केले आहे.
पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या आदेशानुसार, पोलिस कर्मचारी हेडकॉन्स्टेबल संजय खंडारे, ज्ञानेश्वर देशमुख, आणि पोलिस कॉन्स्टेबल सुशील सत्रे यांनी ही कारवाई केली. भागदरा गावातील गणेश देविदास जोगी आणि नामदेव देविदास जोगी या व्यक्तींवर छापा टाकून अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी गावठी हातभट्टीची दारू आणि रसायन हे त्वरित नष्ट केले. या कठोर कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील अनेक लोकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, या प्रकारामुळे अवैध दारू विक्रेत्यांवर मोठा आघात झाला आहे. पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या नेतृत्वाखाली जामनेर पोलिस ठाण्याने अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर कडक नजर ठेवण्याचा निर्धार केला आहे. यापुढेही अशा कारवायांचा सपाटा चालू राहील, असे संकेत देण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे कौतुक केले
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा