जामनेरात राजकोट किल्ल्यावरील घटनेचा निषेध..राष्ट्रवादी काँग्रेसने केली कठोर कारवाईची मागणी - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात राजकोट किल्ल्यावरील घटनेचा निषेध..राष्ट्रवादी काँग्रेसने केली कठोर कारवाईची मागणी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
आज जामनेर येथे, मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर शाखेने जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे साहेबांना निवेदनाद्वारे केली. या घटनेवर तात्काळ कठोर पावले उचलून युगपुरुष, आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य दिव्य पुतळ्याची उभारणी त्या ठिकाणी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.हे निवेदन तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांच्या लेटरहेडवर सादर करण्यात आले. निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख नरेंद्र जंजाळ, जामनेर शहर अध्यक्ष प्रभू झालटे, तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग अरविंद तायडे, तालुका उपाध्यक्ष पंडित नाईक, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शिंदे, बाळू पोटदुखे, तालुका कार्याध्यक्ष विद्यार्थी गौरव पाटील, तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी उदय गायकवाड, पराग नेरकर, तसेच राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
ही मागणी परिसरातील जनतेच्या भावना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी असलेली निष्ठा दर्शवते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads