जामनेर तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना: DBT प्रक्रिया त्वरित पूर्ण करा.. - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना: DBT प्रक्रिया त्वरित पूर्ण करा..

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील सर्व संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना लाभार्थींना एक महत्त्वपूर्ण सूचना दिली जात आहे. ज्यांना या योजनेंतर्गत रुपये 1500/- प्रमाणे लाभ मिळतो आहे, त्यांनी आपले अनुदान नियमित मिळावे म्हणून खालील सूचनांचे पालन करावे.
सर्व लाभार्थींनी आपले आधार कार्ड अपडेट करावे, तसेच आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करावा. याशिवाय आधार हे आपल्या बँक खात्याला लिंक करणे अत्यावश्यक आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, अद्यतनित आधार कार्ड, बँक पासबुक, व मोबाईल नंबर यांची माहिती आपल्या गावातील तलाठी, कोतवाल किंवा तहसील कार्यालयाच्या संगणक शाखेत त्वरित जमा करावी. या सूचनेचे पालन न केल्यास, सरकारच्या वतीने थेट अनुदान आपल्या बँक खात्यावर जमा होण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे, लाभार्थींनी लवकरात लवकर DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रक्रिया पूर्ण करावी.
तहसीलदार, जामनेर
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads