वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे आमदंगाव येथील शेतात डुक्कर पिल्लांचा संहार... श्रीकृष्ण कोलते यांची तक्रार
बोदवड तालुक्यातील आमदंगाव येथील शेतकरी श्रीकृष्ण निळकंठ कोलते यांच्या शेतात वन्यप्राणी प्रकारातील डुक्कर मादी व तिचे पिल्ले मका पिकाचे नुकसान करीत होते. शेतकऱ्यांनी या संदर्भात वनपाल दिपाश्री जाधव यांना संपर्क साधला व डुक्कर मादी व तिचे पिल्ले शेतातून बाहेर काढण्याची विनंती केली.त्यानंतर वनपाल दिपाश्री जाधव व वनविभागाचे कर्मचारी गट क्रमांक ४४ मधील शेतात दोन कुत्र्यांसह आले. त्यांनी या कुत्र्यांना शेतात सोडले आणि शेतात जोरात आरडाओरडा केला. कुत्र्यांनी शेतात दोन डुक्करांच्या पिल्लांवर खूप ठिकाणी चावले, ज्यामुळे काही तासांतच या पिल्लांचा मृत्यू झाला.
शेतकऱ्यांनी यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी मुक्ताईनगर यांना नुकसान भरपाईसाठी निवेदन दिले आहे. जिल्ह्यातील वाचकांच्या लक्षात असलेल्या या प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होईल का, हे पाहणे महत्वाचे आहे. वन्यप्राणी रक्षणाच्या दृष्टीने असलेले हे वाईट उदाहरण वन्यप्राण्यांची स्थिती किती धोक्यात आहे, हे दर्शवते.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा