निकृष्ट रस्त्यामुळे तरुणाचा मृत्यू..नेरी टोल नाक्यावरील रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरली
जळगाव - संभाजी नगर महामार्गावरील नेरी टोल नाका परिसरात खराब रस्त्यांमुळे एका गरीब कुटुंबातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या अपुऱ्या आणि निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या बांधकामामुळे रोज अपघात होत आहेत, ज्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.ग्रामस्थांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन उद्यापासून काम सुरू न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे तालुकाध्यक्ष आशिष दामोदर, माजी सरपंच संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष भगवान इंगळे, विवेक कुमावत, ग्राम पंचायत सदस्य सोनू खोडपे, सागर कुमावत, मनोज कुमावत, ईश्वर कोळी, महेश कुमावत, दीपक भोई, गौरव हिरे, शंकर कुमावत, समाधन कुमावत यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा