मयूर पाटील यांचे एमपीएससीतून मंत्रालयात निवड: जामनेर तालुक्यातून अभिनंदनाची लाट
जामनेर येथील मयूर धनराज पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतून यश मिळवत महाराष्ट्र राज्य शासनाच्या मंत्रालय, मुंबई येथे सहाय्यक कक्ष अधिकारी (ए.एस.ओ.) वर्ग दोन पदावर आपली नियुक्ती निश्चित केली आहे. त्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे जामनेर तालुक्यातून अभिनंदनाची लाट उसळली आहे.मयूर पाटील यांनी आपले शालेय शिक्षण इंदिराबाई ललवाणी शाळेतून पूर्ण केले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी आपल्या शालेय काळातच आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली होती. पुढे त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर एमपीएससीच्या परीक्षेसाठी तयारी सुरू केली.
एमपीएससीच्या कठीण परीक्षेत यश मिळवण्यासाठी मयूर पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या यशामागे त्यांच्या कठोर अभ्यास, शिस्तबद्ध वेळापत्रक आणि आत्मविश्वासाची मोठी भूमिका आहे. त्यांच्या निवडीमुळे कुटुंबीय, मित्रमंडळी, शिक्षक आणि जामनेर तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मयूर पाटील यांच्या या उल्लेखनीय यशामुळे ते इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. त्यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. मयूर पाटील यांचे हे यश जामनेर तालुक्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.
Previous article
Next article
Big Big Congratulations....
उत्तर द्याहटवा