जामनेरात गरजूंची फसवणूक करणाऱ्या एजंटांना मनसेचा इशारा ..पैसे परत करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात गरजूंची फसवणूक करणाऱ्या एजंटांना मनसेचा इशारा ..पैसे परत करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
 जामनेर तालुक्यातील अनेक गरीब, गरजू, अपंग, विधवा आणि वृद्ध व्यक्तींना अपंग प्रमाणपत्र मिळवणे, पगार सुरू करणे अशा कामांसाठी काही एजंटांनी 2 ते 5 हजार रुपये उकळले आहेत. या प्रकारामुळे फसवणुकीचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या अनेक तक्रारी मनसे तालुकाध्यक्ष अशोक कृष्णा पाटील यांच्याकडे फोनद्वारे प्राप्त होत आहेत.या एजंटांनी अनेक लोकांकडून घेतलेले पैसे परत केले नाहीत. त्यामुळे मनसे तालुकाध्यक्ष अशोक कृष्णा पाटील यांनी जामनेर पोलीस ठाण्यात संबंधित तक्रारदारांच्या समवेत तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ज्यांच्या कडून पैसे घेतले आहेत त्यांनी लवकरात लवकर परत करावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.याबरोबरच त्यांनी इशारा दिला आहे की, गोर-गरीब जनतेकडून जास्त पैसे घेतल्यास गाठ माझ्याशी राहील आणि अशा फसवणूक करणाऱ्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल.

अशोक कृष्णा पाटील,  
मनसे तालुकाध्यक्ष, जामनेर
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads