महाराष्ट्र
दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत ; प्रती एकरी २५ हजार अग्रीम मदत द्यावी :- सोमनाथ वैद्य यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील पावसामुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत.प्रती एकरी २५ हजार अग्रीम मदत देण्यात यावी, अशी मागणी स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले सोमनाथ वैद्य यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन तातडीने थेट मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. दक्षिण सोलापुर विधानसभा मतदार संघातील दि. १ व २ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या संततधर पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. येत्या काही दिवसात काढणीला येणा-या पिकांचे नुकसान झालेले आहे. गेल्या दोन महिन्यापुर्वी या भागातील शेतक-यांनी ३० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या केल्या होत्या. त्यासाठी प्रति एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च करण्यात आला होता. या भागातील शेतकरी अत्यंत गरीब असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरु आहे. गेल्या २ दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे काढणीला आलेल्या उडीद, तुर, मका, लिंबू, कांदा तत्सम पिकाच्या उत्पादनांमध्ये ८० टक्के पेक्षा घट होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी व त्यावर आधारीत सर्व रोजगारी लोकांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. दक्षिण सोलापूर येथील शेतक-यांचे संततधर पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे स्थानीक आपत्ती घटकांतर्गत पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित करुन प्रती एकरी २५ हजार अग्रीम मदत देण्याबाबत आदेश व्हावेत. तसेच कृषी विभागासही आदेश करावेत, असेही सोमनाथ वैद्य यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पिक नुकसान पंचनाम्याबाबत मदत व पुनर्वसन कार्यालयास केले सुचित...
सोमनाथ वैद्य यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला अर्ज पीक नुकसान पंचनामे बाबत पुढील कार्यवाहीसाठी मदत व पुनर्वसन (महसूल व वन विभाग) यांना पाठविण्यात आला आहे. यामुळे लवकरच कार्यवाही होणार आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा