श्री व्यंकटेश बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न; बचत गटाच्या नव्या दिशेचा संकल्प - दैनिक शिवस्वराज्य

श्री व्यंकटेश बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न; बचत गटाच्या नव्या दिशेचा संकल्प

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
श्री. व्यंकटेश बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा ४ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता हॉटेल राधाकृष्ण, नाकोडा पार्क, जामनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संदिप महाजन होते.यावेळी गटाचे मार्गदर्शक अमोलभाऊ झाल्टे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या जास्तीत कर्जाचा बचत निधी उद्योगासाठी वापरावा आणि बचत गट आता फक्त बचत गट म्हणून मर्यादित न राहता उत्पादक व व्यवसायिक गट म्हणून पुढे मार्गक्रमण केले पाहिजे." त्यांनी विविध उपप्रकल्पात सहभाग घेऊन गटाच्या आणि आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करण्याचे आवाहन केले.सभेत मागील वर्षाचा हिशोब, जमा-खर्च मंजूर करण्यात आला आणि कर्ज वाटप मर्यादा ७५ ते ८० हजारांपर्यंत ठरविण्यात आली. मासिक वर्गणी १५०० रुपये आणि व्याजदर १.५% निश्चित करण्यात आला. गटाचे सचिव जितेंद्र गोरे यांनी सभासदांना आपली कागदपत्रे लवकरात लवकर जमा करण्याचे आवाहन केले व गटाच्या नवस्वरूपाबद्दल आणि पुढील वर्षाचे नियोजन याबाबत माहिती दिली.सभेसाठी गटाचे प्रमुख सभासद अमोल छगनराव झाल्टे, अरुण जगन्नाथ महाजन, अरुण शंकर मिरगे, गजानन काशिनाथ पवार, समाधान ओंकार माळी, गोरख रामदास सोनार, अश्विन रमेश रोकडे, रविंद्र नारायण पर्वते, सागर सुरेश औटी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र गोरे यांनी केले, सूत्रसंचालन अश्विन रोकडे यांनी केले, आणि आभार प्रदर्शन गजानन पवार यांनी मानले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads