गणेशोत्सव आयोजनाबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न...
जळगाव: जिल्हा नियोजन सभागृहात गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, महानगरपालिका आयुक्त श्री ज्ञानेश्वर ढेरे आणि गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या तयारीसाठी मंडपांची सुरक्षा, विसर्जन मार्ग, वाहतूक नियमन, आणि साफसफाई यासारख्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व मंडळांना नियमांचे पालन करत सण साजरा करण्याचे आवाहन केले आणि प्रशासनाने पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. बैठकीदरम्यान सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन गणेशोत्सव शांततेत आणि सुव्यवस्थेतील वातावरणात साजरा करण्याचे वचन दिले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा