कमल हॉस्पिटलच्या वतीने बोरगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न - दैनिक शिवस्वराज्य

कमल हॉस्पिटलच्या वतीने बोरगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर (बोरगाव) महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस (गृह/विधी व न्याय) यांच्या राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष व भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी यांच्या समन्वयाने, तसेच माननीय मंत्री श्री गिरीशभाऊ महाजन व सौ. साधनाताई महाजन यांच्या आशीर्वादाने, कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होम यांच्या तर्फे जामनेर विधानसभा क्षेत्रातील बोरगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात 128 रुग्णांचे आरोग्य तपासणी करण्यात आले. शिबिरात आवश्यकतेनुसार ECG, एक्स-रे, रक्त तपासण्या आदी विविध तपासण्या करण्यात आल्या. ज्यांना अधिक तपासणीची गरज होती अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. शिबिरामध्ये ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील.
या शिबिरामध्ये कमल हॉस्पिटलचे संचालक तथा वैद्यकीय आघाडी जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, डॉ. गिरधारी जेधे, डॉ. रवी सुरळकर, खडकी बोरगावचे सरपंच श्री रमेश नाईक, ग्रामपंचायत सदस्य विकास वंजारी, डॉ. शिवानी लोखंडे, डॉ. साक्षी पाटील, बोरगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री सपकाळे सर तसेच कमल हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा झाला असून, लोकांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराच्या आयोजनामुळे कमल हॉस्पिटल आणि भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या उपक्रमांची प्रशंसा होत आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads