हतनूर धरणातून तापी नदी पात्रात पाणी सोडले ...नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन. - दैनिक शिवस्वराज्य

हतनूर धरणातून तापी नदी पात्रात पाणी सोडले ...नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन.

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून तापी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीच्या आसपासच्या परिसरात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सतर्कता राखण्यासाठी आपदा मित्रांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक नदीकाठच्या गावांमध्ये गस्त घालून नागरिकांना जागरूक करत आहे. नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे दुर्घटनांचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी तापी नदीच्या पात्रात जाणे टाळावे व आपले पशुधनही नदीकाठी नेऊ नये.
धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे काही गावांना धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना लक्षात ठेवून आवश्यक खबरदारी घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तातडीच्या मदतीसाठी आपदा मित्रांचे पथक तयार ठेवले असून, कोणतीही मदत हवी असल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि धैर्य बाळगावे. 
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads