दक्षिण सोलापूर मधील लोकांना निस्वार्थी व आपल्यातील व आपल्यासाठी लढणारा समाजसेवक महादेव कोगनुरे.... सर्वसामान्य माणूस हीच महादेव कोगनुरेची ताकत..... - दैनिक शिवस्वराज्य

दक्षिण सोलापूर मधील लोकांना निस्वार्थी व आपल्यातील व आपल्यासाठी लढणारा समाजसेवक महादेव कोगनुरे.... सर्वसामान्य माणूस हीच महादेव कोगनुरेची ताकत.....


समीर शेख प्रतिनिधी
 सोलापूर : महादेव कोगनुरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीकडे पाहिल्यास ९०टक्के समाजकारण आणि १० टक्के राजकारण हे त्यांचे गणित असल्याने ते युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. शेतकरी व सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवत रस्त्यावर उतरणारे महादेव कोगनुरे आज लोकांच्या घरातच नव्हे तर मनामनात पोहचले आहेत. लहान मुलांपासून जेष्ठ नागरिकांच्या हाकेला ओ देत नुसते इतर राजकीय नेत्याप्रमाणे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला न पोहचता दुःखात पुढे व सुखात मागे हे तत्व अंगीकारत त्यांनी आपले काम सुरु ठेवले आहे. 
       जिद्दीने कार्यरत असलेल्या महादेव कोगनुरे चा अश्वरथ सध्या दक्षिण सोलापूर च्या राजकीय पटलावर सैराट धावताना दिसत आहे. ज्या व्यक्तिमत्वाची ओळख गेल्या सहा वर्षांपूर्वी राजकीय वर्तुळात कोठेच नव्हती. परंतु, आज या व्यक्तिमत्वाची दक्षिण सोलापूर च्या राजकारणात आदराची व वैशिष्ट्यपूर्ण अशी ओळख निर्माण झाली आहे. निस्वार्थी, प्रेमळ,सालस, तितकेच करारी, जिद्दी, मुत्सद्दी, त्यागी असे स्वभावाचे विविध पैलू साकारलेले व्यक्तिमत्व म्हणजे महादेव कोगनुरे.
   महादेव कोगनुरे यांनीआपल्या मोजक्या काही वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत दक्षिण सोलापूर च्या राजकारणात गरुड भरारी घेत निर्माण केलेले वादळ हा त्यातीलच एक भाग होय. त्यांच्या पाठीमागे वडिलांची राजकीय पार्श्वभूमी नसली तरी त्यांनी स्वतःचे निर्माण केलेले वलय नाकारता येण्यासारखे नाही.पहिल्यापासून सर्वसामान्यांमध्ये राहिलेल्या महादेव कोगनुरे यांनी राजकारणात सक्रिय झाल्यावरही सर्वसामान्य लोकांना आपलेसे केले. त्यांच्या या स्वभावाने जनसामान्यांनी त्यांना आज डोक्यावरच घेतले आहे.दक्षिण सोलापूर मधील लोकांना निस्वार्थी व आपल्यातील व आपल्यासाठी लढणारा लढवय्या नेता मिळाल्याचा आनंद आज सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
दक्षिण सोलापूर मतदारसंघातील राजकीय क्षितिजावरील तळपता तारा नव्या उभारीने, नव्या जोमाने पुढे येईल आणि जनतेच्या अडचणी,समस्या प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads