मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश...
जामनेर, आज मतदारसंघातील बेटावद, सोनाळा आणि चिलगाव या गावांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) शेकडो कार्यकर्त्यांनी जामनेर येथे भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा ग्रामविकास मंत्री मा. ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला या भागात मोठे बळ मिळाले असून, स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कार्यक्रमाच्या वेळी गिरीष महाजन यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत, भाजप हे केवळ एक राजकीय पक्ष नसून विकासाच्या संधींचे व्यासपीठ आहे, असे सांगून आगामी काळात सर्वांना एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.या वेळी भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा