जळगावमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवत केली सुरुवात... - दैनिक शिवस्वराज्य

जळगावमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवत केली सुरुवात...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव  लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला. 
रस्ता सुरक्षा नियमांबाबत जनजागृती करणे, नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतुकीबाबत सजगता निर्माण करणे हा या रॅलीचा उद्देश होता. रॅलीमध्ये स्थानिक नागरिक, विद्यार्थी, आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रॅली दरम्यान, रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी रस्ता सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले आणि वाहनचालकांनी हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर, वेग मर्यादा, आणि इतर नियमांचे पालन करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी पुढे सांगितले की, "रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे हे प्रशासनाचे एक महत्त्वाचे पाऊल आहे, परंतु नागरिकांचा सहभाग तितकाच आवश्यक आहे." या रॅलीमुळे रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads