ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी; शेतकऱ्यांना तातडीची मदतीचे दिले निर्देश - दैनिक शिवस्वराज्य

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी; शेतकऱ्यांना तातडीची मदतीचे दिले निर्देश

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दी .३ रोजी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या समस्यांना जाणून घेतले.
महाजन यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले की लवकरात लवकर पिकांचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करावी. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत म्हटले की, शेतकऱ्यांना लवकरच न्याय मिळेल आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
महाजन यांच्या पाहणीदरम्यान, स्थानिक प्रशासन अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी महाजन यांच्यासमोर आपली व्यथा मांडली आणि मदतीची विनंती केली. महाजन यांनी आश्वासन दिले की शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने मिळेल.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads