महाराष्ट्र
संग्राम मोर्चात शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे :- महादेव कोगनूरे
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित केलेल्या भव्य संग्राम मोर्चा मध्ये जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी, महविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विराट संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दक्षिण काँग्रेस चे नेते तथा एम के फाउंडेशन चे संस्थापक महादेव कोगनूरे यांनी केले आहे.
शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्काच्या, विविध मागण्यासाठी, महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भव्य संग्राम मोर्चा आयोजित केला आहे.
मंगळवार दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता चार हुतात्मा पुतळा, पार्क चौक येथून हा मोर्चा निघणार आहे. तरी या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव नागरिक बंधू भगिनींनी, तसेच दक्षिण सोलापूर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दक्षिण काँग्रेस चे नेते तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनूरे यांनी केले आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा