महाराष्ट्र
लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को-जन इंडस्ट्रीज लिमिटेड भंडारकवठे साखर कारखान्याचे रोलर पूजन संपन्न....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप): लोकमंगल साखर कारखाना भंडारकवठे येथे सिझन २०२४-२५ रोलर पूजा संपन्न झाले.
यावेळी लोकमंगल शुगर्सच्या तीन कारखान्यांपैकी भंडारकवठे येथील लोकमंगल शुगर इथेनॉलॲड को जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याने २०२३-२४ च्या गळीत हंगामापोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा २९.७० टक्के अधिक दर दिलेला असून तो प्रतिटन ६२१ रुपये जादा आहे असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
भंडारकवठे येथील या साखर कारखान्याने २०२३-२४ या गळीत हंगामात ४ लाख ३ हजार ६६ टन उसाचे गाळप केले. शेतकऱ्यांना एफआरपी दर २०९४ रुपये प्रति टन असा देय होता पण कारखान्याने २७१५ रुपये दर दिला. यातून शेतकऱ्यांना एकूण ८४ कोटी ४० लाख रुपये देणे सरकारी नियमानुसार अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात १०९ कोटी ४६ लाख रुपये देण्यात आले. ही जादा रक्कम २५ कोटी ६ लाख रुपयांनी जास्त आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली ही रक्कम नियमानुसार देणे असलेल्या रकमेपेक्षा २९.७० टक्क्यांनी जास्त आहे असे श्री. देशमुख यांनी सांगितले.
साखर कारखाना हा लगतच्या भागातले विकासाचे इंजिन असतो. कारखान्यात साखर तयार करून आम्ही परिसरात एक अब्ज रुपये अर्थकारणात आणले आणि विकासाला चालना दिली आहे. त्याचे परिणाम आपल्याला दिसत असतातच. २०२३-२४ चा हंगाम साखर कारखान्यासाठी अडचणीचा होता. कारण उसाची कमतरता होती. पण तरीही या परिसरातल्या शेतकऱ्यांनी या कारखान्यावरचा आपला विश्वास व्यक्त करून जास्तीत जास्त ऊस या कारखान्याला दिला. शेतकरी आणि काखाना यांच्या संयुक्त प्रयत्नातून गाळप हंगाम यशस्वी झाला. उसाची उपलब्धता कमी होती पण तरीही शेतकऱ्यांनी भंडारकवठ्याच्या या कारखान्याला आपला ऊस देऊन लोकमंगल समूहाला मोठे सहकार्य केले म्हणून आपण हे करू शकलो.अखेरच्या टप्यात ज्या शेतकयांनी ऊस गाळपास दिले त्यांच्या उसाचे पेमेंट करण्यात काही अडचणी आल्यामुळे काहींसा विलंब झाला पण याही बाबतीत शेतकऱ्यांनी सहकार्य केले. लोकमंगल कारखान्याचे पेमेंट मिळणारच असा विश्वास शेतकऱ्यांनी ठेवला. त्यास प्रतिसाद देऊन आम्हीही शक्य असेल तेवढे जादा पेमेंट केले आहे, सरकारने ऊस तोड कामगारांना त्यांच्या मजुरीत ३४ टक्के वाढ मंजूर केली आहे. त्याचे पेमेंट कारखाना लवकरच अदा करील असे महेश देशमुख यांनी प्रतिपादन केले. तसेच याही वर्षी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस देऊन असेच सहकार्य करावे असे आवाहन केले. कारखाना यंदाही विक्रमी गाळप करण्यास तयार आहे आणि शेतकऱ्यांना चांगला दर देण्याबाबत कटाक्षाने प्रयत्न करणार आहे अशी खात्री त्यांनी दिली.
सध्या पाऊस चांगला पडला आहे आणि सर्वत्र त्याचा फायदा घेऊन एकरी १०० टन ऊस उत्पादन करण्याचा हुरूप शेतकऱ्यांत वाढत आहे. त्याचे तज्ञांकडुन प्रशिक्षण देण्याचे कार्य सर्व गटातुन, गावागावातुन शेती खात्यामार्फत केले जात आहे. उसाची शेती आणि साखर कारखानदारी यांचे भवितव्य चांगले असल्याचे आशादायक वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे कारखाना प्रगतीपथावरच राहील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.
यावेळी कारखान्याचे मान्यवर आणि कारखाना खातेप्रमुख, कर्मचारी यांची व भंडारकवठे सरपंच भिमाशंकर बबलेश्वर,ग्रा. सदस्य यतीन शहा, जनरल मॅनेंजर (टेक्नीकल) गजराज रूद्रमठ, जनरल मॅनेंजर (प्रोसेस) जी गुणाणशेखरन, किशोर जोशी (प्रोसेस मॅनोंजर), केन मॅनेंजर दिपक नलवडे , इन्स्ट्रुमेंट मॅनेंजर विट्टल देशमुख, डी. एम.प्लान्ट मॅनेंजर एम. पदमराज, इलेक्ट्रीकल मॅनेजर अखिल बिटे , डेप्युटी चिफ इजिनिअर इकबाल शेख ,एच आर मॅनेंजर विवेक पवार , असि.एच आर मॅनेंजर नंदकिशोर कदम ,टाईम किपर श्रीशैल लोखंडे , ईटीपी इन्चार्ज कपिल शिंदखेडे आणि इतर सर्व कर्मचारी आदि उपस्थीत होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा