तळेगांव जवळील राज बार चोरी प्रकरण.. जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या नेतृत्वाखाली आरोपींना अटक, माल हस्तगत - दैनिक शिवस्वराज्य

तळेगांव जवळील राज बार चोरी प्रकरण.. जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या नेतृत्वाखाली आरोपींना अटक, माल हस्तगत

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील तळेगावजवळील राज बियर बारमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी जामनेर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत आरोपींना अटक करून चोरी केलेला माल हस्तगत केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती, मात्र पोलिसांनी जलद गतीने तपास करत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्याने स्थानिक नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
बारमधून चोरट्यांनी इन्व्हर्टर बॅटरी आणि दारूचे बॉक्स असे मिळून सुमारे ३५,००० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या चोरीप्रकरणी बार मालकाने तातडीने जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

गोपनीय माहितीवरून आरोपी अटकेत  
जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत, आरोपी शेख अमीर जाकिर (वय २२) आणि फातिर मिया तुफेल महुम्मद (जामनेर) यांना अटक केली. या आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संपूर्ण पोलीस पथकाची कामगिरी  
सदर कारवाई जामनेर पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सागर काळे, निलेश घुगे, तुषार पाटील, भगवान पाटील, गोविंदा बेळके, संजय खंडारे, रवींद्र बिऱ्हाडे, चंद्रकांत पाटील ,सुरेंद्र पाटील, गोपाल शिंदे, स्वप्निल चौधरी , बळगुजर, लासे, आणि दीपक खंडारे यांनी पार पाडली. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीने चोरीप्रकरणाचा पर्दाफाश करत आरोपींना गजाआड केल्याने परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे.

पोलिसांच्या या तात्काळ कारवाईचे कौतुक 
या कारवाईमुळे नागरिकांनी जामनेर पोलिसांचे कौतुक केले असून, परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास वाढला आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads