गोद्री येथील ढालकी धबधबा परिसरात पर्यटकांसाठी प्रवेशबंदी, वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी वन विभागाचे आदेश - दैनिक शिवस्वराज्य

गोद्री येथील ढालकी धबधबा परिसरात पर्यटकांसाठी प्रवेशबंदी, वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी वन विभागाचे आदेश

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर (सप्टेंबर २०२४) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथील ढालकी धबधबा परिसर राखीव वन क्षेत्र म्हणून घोषित केला असून, येथील बिबट्या, अस्वल आणि इतर वन्य प्राण्यांचा वावर असल्याचे सूचित केले आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि पर्यटन कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पुढील १५ दिवसांकरिता या परिसरात पर्यटकांचा प्रवेश पूर्णतः बंद करण्यात आला आहे.वन विभागाच्या अधिकृत आदेशानुसार, या क्षेत्रात प्रवेश करणे, वन पर्यटनाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण करणे, किंवा शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे हे भारतीय न्याय संहिता २०२३ आणि भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत दखलपात्र गुन्हा मानले जाईल. याशिवाय, या क्षेत्रात धूम्रपान, मद्यपान तसेच हुल्लडबाजी करण्यावर सक्त मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
सदर बंदी ही वन विभागाच्या पर्यटन कामानिमित्त असून, १५ दिवसांनंतर पुन्हा एकदा पर्यटकांसाठी पर्यटन स्थळ खुले करण्यात येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्राधिकारी, जामनेर यांनी दिली आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads