दिलीप खोडपे सर यांच्या भाजप राजीनाम्यानंतर राजकीय भूकंप – शरद पवार गटात प्रवेशाची चर्चा, मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आव्हान
जामनेर भाजपला जामनेर तालुक्यात मोठा धक्का बसला आहे, ज्येष्ठ नेते दिलीप खोडपे यांनी आज पक्षाच्या सदस्यपदाचा धडाकेबाज राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने तालुक्यात राजकीय भूकंप घडवला असून, शरद पवार गटात त्यांच्या संभाव्य प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. खोडपे यांच्या या धाडसी पावलामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाची चिंता वाढली आहे.खोडपे यांनी आपल्या राजीनाम्यानंतर स्पष्ट शब्दांत सांगितले की, मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीत मी उभा राहणार आहे, आणि मला संधी मिळाल्यास मी जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या घोषणेमुळे महाजन यांच्या राजकीय साम्राज्याला कडवे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत खोडपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासोबत काही गुप्त बैठका घेतल्याची जोरदार चर्चा आहे. या बैठकीनंतर खोडपे लवकरच पवार गटात प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे भाजपच्या नेतृत्वाला धक्का बसला असून, आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या पायाखालची वाळू सरकू शकते.खोडपे यांच्या या निर्णयामुळे जामनेर तालुक्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपला या संकटाचा सामना कसा करावा लागेल आणि मंत्री गिरीश महाजन यांचं पुढील राजकीय भविष्य काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा