मुख्यमंत्री यांच्या हस्ते भुसावळच्या भूमिपुत्राचा मुंबईत सन्मान - दैनिक शिवस्वराज्य

मुख्यमंत्री यांच्या हस्ते भुसावळच्या भूमिपुत्राचा मुंबईत सन्मान

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे दरवर्षी दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार यावर्षी भुसावळ शहराच्या हाती लागला आहे. यंदा हा पुरस्कार आय.ई.एस. नवी मुंबई हायस्कूल, वाशी येथील उपक्रमशील आणि तंत्रस्नेही शिक्षक श्री. मनोज महाजन यांना देण्यात आला.शिक्षक दिनानिमित्त मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरातील टाटा सेंटरमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री. महाजन यांना प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री. मनोज महाजन यांचे माध्यमिक शिक्षण भुसावळ येथील महाराणा प्रताप विद्यालयात आणि महाविद्यालय शिक्षण पी.ओ. नाहटा कॉलेज भुसावळात झाले. त्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासातच सामाजिक कार्यातही सक्रिय असण्याची गोडी लागली होती. सध्या ठाणे जिल्ह्यातील आय.ई.एस. नवी मुंबई हायस्कूल वाशी येथे इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत असलेले श्री. महाजन राज्यातील NEP आधारित क्षमता वृद्धी प्रशिक्षणातही तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
श्री. महाजन यांना हा पुरस्कार दिल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला मान्यता मिळाली आहे. जिल्हा व राज्य पातळीवरील मुलाखतींमध्ये त्यांच्या कार्याची प्रशंसा होऊन त्यांची निवड राज्य पुरस्कारासाठी झाली होती. त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads