महाराष्ट्र
दादपूर शाळेचे केंद्रस्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत घवघवीत यश...
समीर शेख प्रतिनिधी
मोहोळ ( कुरूल) : कुरूल केंद्रस्तरीय व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा दादपूरने घवघवीत यश संपादन केले आहे.
या स्पर्धा कुरूल येथे घेण्यात आल्या या स्पर्धेत कथाकथन स्पर्धेत लहान गटात इ. ४ थी ची प्रांजल लक्ष्मण पाटील व मोठ्या गटात अमृता काळे इ.६ वी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच वक्तृत्व स्पर्धेत कु आदिती ओहोळ इ. ८ वीं हिने प्रथम क्रमांक मिळवला. निबंध स्पर्धेत मोठ्या गटात पूजा वायकुळे हिने प्रथम क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे मोठ्या गटातील समूहगीत व लोकनृत्य स्पर्धेत दादूपूर शाळेने प्रथम क्रमांक मिळवत उपस्थितांचे मनोरंजन केले.
या स्पर्धेसाठी माधुरी कुंभार, अश्विनी पाटील, प्रशांत गाजूल, शिवप्पा हत्तीकर, इंद्रजित जगताप, संतोष काटकर व संतोष मुळे या शिक्षकांचे मार्गदर्शन लागले. शाळेचे मुख्याध्यापक भीमराव परीक्षाळे व केंद्रप्रमुख राजकुमार राऊत व शाळेतील शिक्षक व पालकांनी या सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले व तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा