महाराष्ट्र
वडापूर ता.द.सोलापूर येथे विविध विकास कामाचे उद्घाटन संपन्न....
समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी : वडापूर ता. द. सोलापूर येथे 13 ऑक्टोबर रोजी डेप्युटी सरपंच सविता विजय उर्फ तानाजी वाघचौरे यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन संपन्न झाले.
पंचशील नगर या ठिकाणी बंदिस्त गटार तसेच अण्णाभाऊ साठे नगर येथे बंदिस्त गटार या कामाचा शुभारंभ केला असून या कामासाठी लागणारा निधी मुंबई वसई विरार येथील बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या शिफारसी वरून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासनाकडे याचा पाठपुरावा करून मंजूर केला असून हा निधी वडापूर गावला मिळवण्यासाठी म्हणून सोलापूर जिल्हा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माननीय प्रवीण सोनवणे यांनी प्रयत्न केला असून वडापूर गावाला दहा लाखाचा निधी मिळण्यास मदत झाली आहे.
तसेच स्थानिक पातळीवर वडापूर गावाला निधी मिळवण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धार्थ कांबळे यांनी वडापूर ग्रामपंचायत कडून तसा त्या कामाबाबतचा ठराव घेऊन वरील मान्यवर महोदयाकडे निधी मिळण्यासाठी प्रयत्न केला असून या कामाचा वडापूर येथे शुभारंभ केला आहे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापूर येथे शोषखड्डा पाडण्याच्या कामाचा शुभारंभ हि करण्यात आला.
यावेळी वडापूर गावच्या ग्रामपंचायत च्या सदस्या बायडा सिद्धार्थ कांबळे, कल्पना हेगडे, आनंदा पाटील, नितीन भंडगे, विनोद कांबळे, समाधान कांबळे, राम पारसे, रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धार्थ कांबळे व ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा