रावेरात गिरीश महाजनांचा ‘देशमुखी’ डाव यशस्वी..अमोल जावळे यांचा दणदणीत विजय - दैनिक शिवस्वराज्य

रावेरात गिरीश महाजनांचा ‘देशमुखी’ डाव यशस्वी..अमोल जावळे यांचा दणदणीत विजय

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांनी दणदणीत विजय संपादित केला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर यावेळी पक्षाच्या प्रतिष्ठेची लढत होती. ही प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतःची ताकद पणाला लावली. त्यांच्या खेळीने यंदा विजयाचे तोरण भाजपच्या नावावर बांधले.महाजनांनी मतदारसंघाची जबाबदारी जिल्ह्यातील विश्वासू सहकारी अरविंद देशमुख यांच्यावर सोपवली. देशमुख यांनी त्यांच्या संघासोबत रात्रंदिवस प्रचार मोहीम राबवत प्रभावी नियोजन केले. गावागावांत कॉर्नर सभा, जाहीर सभा, आणि मतदारांशी थेट संवाद साधत त्यांनी भाजपसाठी मतांचे गणित मजबूत केले.
या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी निवडणूक न लढता पुत्र धनंजय चौधरी यांना उमेदवारी दिली होती, तर प्रहार संघटनेचे अनिल चौधरी, अपक्ष दारा मोहम्मद, आणि वंचित बहुजन आघाडीचे शमिभा पाटील यांच्या सहभागामुळे चुरशीची पंचरंगी लढत पाहायला मिळाली. मात्र, देशमुख यांच्या अतुलनीय मेहनतीने अमोल जावळे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील मायक्रो नियोजन आणि अरविंद देशमुख यांच्या अथक परिश्रमांनी भाजपला रावेरमध्ये विजय मिळवून दिला. मतदारसंघात यंदा ‘देशमुखी’ डावाने भाजपला परत एकदा ताकदवान स्थान मिळवून दिले आहे.हा विजय भाजपसाठी नव्या आशा पल्लवित करणारा ठरला आहे

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads