मादनी गावाजवळ भीषण अपघात: लालखाह उखडू तडवी जागीच ठार
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार
जामनेर तालुक्यातील मादनी गावाजवळ आज सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात मादनी येथील लालखाह उखडू तडवी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका गंभीर होता की वाहनाने त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मादनी गावातील सरपंच पती यांनी पोलिसांना दिली. त्यांनीच पोलिसांना तातडीने घटनास्थळी बोलावून घेतले. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हजेरी लावून तपास सुरू केला आहे. अपघात कोणत्या वाहनाने घडला याची माहिती अद्याप मिळालेली नाही.दरम्यान, जालमसिंह यांनी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली, परंतु तडवी यांना वाचवणे शक्य झाले नाही. या दुर्दैवी घटनेमुळे मादनी गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिस अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेत आहेत. नागरिकांना या संदर्भात काही माहिती असल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा